शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

खामगावजवळ भरधाव कार एकमेकांवर आदळल्या; भीषण अपघातात पाच जण जखमी

By अनिल गवई | Updated: December 3, 2024 00:16 IST

खामगाव-शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्यासमोरील घटना; वळणमार्ग बनतेय अपघातप्रवण स्थळ

अनिल गवई, खामगाव - जि. बुलढाणा : भरधाव कार विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन्ही कारमधील पाच जण जखमी झाले. सोमवारी सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान ही घटना खामगाव-शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्यासमोरील वळणावर घडली. दरम्यान, याच ठिकाणी दोन दुचाकीचाही अपघात झाल्याने तिघे जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यात दोन्ही कारमधील पाच जण, तर दोन दुचाकीस्वारांसह एकाचा समावेश असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, एमएच ३०, बीएल- २०७० या क्रमांकाची कार खामगाव येथून शेगाव येथे जात होती. दरम्यान, त्याचवेळी विरुद्ध दिशेने एमएच-२७, डीएल-९७३२ क्रमांकाची कार शेगावकडून राष्ट्रीय महामार्गाने गुजरातकडे जाण्यासाठी येत होते. त्यावेळी महामार्गाच्या पोचरस्त्याच्या काही अंतरावर दोन्ही कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये परतवाडा येथील एकाच कुटुंबातील प्रेमलता ठाकूर (६४), सुरेशसिंह ठाकूर (६८), प्रिया ठाकूर (२८), सर्व रा. परतवाडा तिघे गंभीर जखमी झाले, तर दुसऱ्या कारमधील लखन नथ्थानी, हरलीन नथ्थानी हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. यातील ठाकूर कुटुंबातील तिघांना खामगाव येथील सर्वोपचार रुग्णालयातील उपचारानंतर अकोला येथे हलविण्यात आले, तर नथ्थानी कुटुंबातील दोघांना खामगाव येथील दोन वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

दुचाकी अपघातातील एकाची प्रकृती चिंताजनक

भरधाव कारचा अपघात झाल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी दोन दुचाकींचाही विचित्र अपघात झाला. यात एमएच-२८, बीएक्स-७८३५ या दुचाकीवरील  प्रशांत श्रीकृष्ण पवार, रा. गोळेगाव,  तर सुरेश शंकरराव मांगे, रा. मुकीनपूर यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला. दुचाकी अपघातातील पवार आणि मांगे यांनाही अकोला येथे  दोघांनाही अकोला येथे हलविण्यात आले.

वळणमार्ग बनतेय अपघातप्रवण स्थळ

खामगाव शेगाव रोडवरील जयपूर लांडे फाट्यासमोरील वळण मार्ग अपघातप्रवण स्थळ बनत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी गत काही दिवसांत तीन ते चार अपघात घडल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी घडलेल्या अपघातातील एमएच- ३०, बीएल- २०७० ही कार दुसऱ्या कार आदळल्यानंतर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने रोडखाली काही अंतरावर जाऊन झाडाला अडकली. दोन्ही वाहनांतील एअर बॅग उघडल्यानंतर पुढील अनर्थ टळल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा