बुलढाणा : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना २० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता बुलढाणा–चिखली मार्गावर केळवद गावाजवळील शाळेजवळ घडली. गणेश प्रकाश गायकवाड व उषा गणेश गायकवाड रा. पळसखेड गायकवाड ह. मु. संभाजीनगर चिखली, अशी मृतकांची नावे आहेत.
शिक्षक असलेले गणेश गायकवाड आणि त्यांची पत्नी उषा गायकवाड हे २० एप्रिल राेजी रात्री चिखलीवरुन बुलढाणाकडे येत हाेते. दरम्यान केळवद गावाजवळील शाळेजवळ त्यांच्या दुचाकीस भरधाव आलेल्या कार क्रमांक एमएच १२ जेसी ४८५६ने जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण हाेती की यामध्ये दुचाकीवरील गायकवाड दाम्पत्य ठार झाले. घटनेची माहिती मिळताच चिखली पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे़ या प्रकरणी चिखली पाेलीस पुढील तपास करीत आहेत.