खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी - जाधव
By Admin | Updated: June 17, 2016 02:04 IST2016-06-17T02:04:21+5:302016-06-17T02:04:21+5:30
रेल्वेच्या वरिष्ठ प्रबंधकांकडे घेण्यात आली बैठक.

खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी - जाधव
बुलडाणा: मातृतीर्थ जिल्ह्याच्या विकासाची एक्स्प्रेस सुसाट धावण्यासाठी मंजूर झालेल्या खामगाव-जालना लोहमार्गाचे काम नियोजित कालावधीत पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. त्यामुळे या लोहमार्गाच्या कामांना गती देण्याची आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
रेल्वेच्या मुंबई येथील महाराष्ट्र झोनच्या मुख्यालयात यासंदर्भात खा. प्रतापराव जाधव यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक एस.के. सूद तसेच मुख्य सचिव विनीत कुमार यांच्यासह जनरल विभागाचे प्रबंधक व अन्य अधिकार्यांसह मेहकर येथील आमदार डॉ. संजय रालमुलकर, सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचीसुद्धा उपस्थिती होती. इंग्रजांच्या काळात खामगाव-जालना मार्गाला मंजुरी मिळाली होती. तेव्हापासून तब्बल १00 वर्षे ही मागणी प्रलंबित होती. खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत याबाबत वचननाम्यात शब्द दिला होता. त्यामुळे भाजप-सेनेच्या केंद्रातील सरकारकडे हा प्रश्न खा. जाधव यांनी लावून धरला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मागार्ला हिरवी झेंडी दाखवून तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. १५५ किलोमीटरच्या या मार्गामुळे बुलडाणा जिल्ह्याबाबत ह्यविकासात मागासह्ण हा शब्द पुसला जाईल तसेच येथील शेतीमाल बाजारपेठेत पोहचविण्यासह उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या लोहमार्गाचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाला उच्चस्तरीय बैठक घेण्याच्या सूचना मुंबई येथील बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी केल्या.
याशिवाय तीर्थस्थळाचा ह्यअह्ण दर्जा प्राप्त विदर्भपंढरी शेगावच्या रेल्वे स्थानकाबाबत सातत्याने स्टॉपेज अर्थातच सुफर फास्ट रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा मुद्दाही त्यांनी रेटून धरला. या बैठकीत खासदार जाधव यांनी मॉडेल स्टेशन अंतर्गत सुरु असल्याचा कामांचा आढावा घेतला.