मुस्लिमबहुल मतदान केंद्रावर विशेष कर्मचारी
By Admin | Updated: September 25, 2014 01:14 IST2014-09-25T01:12:34+5:302014-09-25T01:14:17+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील मुस्लिमबहुल मतदान केंद्रावर ६१ परदासीन महिला कर्मचारी.

मुस्लिमबहुल मतदान केंद्रावर विशेष कर्मचारी
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्याने या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. १५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदार संघात १ हजार ९९१ मतदान केंद्र सज्ज करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात मुस्लिम बहूल मतदान केंद आहेत त्या भागातील मतदान केंद्रावर मुस्लिम महिला मतदारांच्या सुविधासांठी परदासीन महिला कर्मचार्यांची नियुक्त करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून ह्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार बुलडाणा विधानसभा मतदार संघात ६१ मतदानकेंद्रांवर परदासीन महिला कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शेलापुर येथे २, जहॉगिरपूर येथे १, माकोडी २, जयपूर २, मोताळा ५, बोराखेडी ३, धामणगाव बढे ७, कोथळी ३, रोहिणखेड ५, राजुर ३, बुलडाणा १६, सागवन २ तथा देऊळघाट के १0 मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदार संघातील मुस्लिम बहुल मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणार्या मुस्लिम महिलांना काही अडचणी आल्या, किंवा मतदान करतांना कोणी आक्षेप घेतल्यास अश्या परिस्थितीत मतदान केंद्रावर उपस्थित परदासीन महिला कर्मचारी ह्या सदर मुस्लिम महिला मतदाराची मदत करतील, अशी महिती तहसिलदार तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी दिपक बाजड यांनी दिली.