बुलडाणा जिल्हा परिषदेत सभापती पदग्रहण समारंभ

By Admin | Updated: April 11, 2017 00:11 IST2017-04-11T00:11:12+5:302017-04-11T00:11:12+5:30

भाजपच्या श्‍वेता महाले, राजेंद्र उमाळे, गोपाल गव्हाळे यांनी स्वीकारला पदभार!

Speaker's inauguration ceremony at Buldana Zilla Parishad | बुलडाणा जिल्हा परिषदेत सभापती पदग्रहण समारंभ

बुलडाणा जिल्हा परिषदेत सभापती पदग्रहण समारंभ

बुलडाणा : जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य भाजपाच्या श्‍वेता महाले, राजेंद्र उमाळे व गोपाळ गव्हाळे यांनी १0 एप्रिल रोजी दुपारी जिल्हा परिषदेतील कक्षात सभापती पदाचा पदभार स्वीकारला.
भाजपाच्या श्‍वेता महाले पाटील यांनी महिला व बालकल्याण, राजेंद्र उमाळे यांनी अर्थ व बांधकाम तसेच गोपाल गव्हाळे यांनी समाजकल्याण विभागाच्या सभापती पदाचा पदभार आपल्या कक्षात स्वीकारला. त्यानंतर शिवाजी सभागृहात पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे, प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, आ. आकाश फुंडकर, भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, राष्ट्रवादीचे राम जाधव, भाजपचे विनोद वाघ व पदाधिकारी उपस्थित होते. पदग्रहण समारंभात बोलताना आ. डॉ. संजय कुटे, आ. चैनसुख संचेती, धृपदराव सावळे यांनी पदाधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांंगीण विकास गावखेड्यापर्यंंत झाला पाहिजे, असे आवाहन केले.

Web Title: Speaker's inauguration ceremony at Buldana Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.