खोडसाळपणातून शेतातील सोयाबीनची सुडी पेटविली; शेजाऱ्यावर संशय

By अनिल गवई | Published: October 18, 2023 03:46 PM2023-10-18T15:46:11+5:302023-10-18T15:46:38+5:30

रात्री ७.३० वाजे दरम्यान सदर सोयाबीनची सुडी कुणीतरी पेटवून दिली

Soybeans in the fields were set on fire; Suspicion of a neighbor in buldhana khamgaon | खोडसाळपणातून शेतातील सोयाबीनची सुडी पेटविली; शेजाऱ्यावर संशय

खोडसाळपणातून शेतातील सोयाबीनची सुडी पेटविली; शेजाऱ्यावर संशय

खामगाव: खोडसाळपणाने एका शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनची सुडी पेटवून दिली. ही घटना बुधवारी रात्री शेगाव तालुक्यातील गायगाव खुर्द शिवारात घडली. या प्रकरणी शेतकऱ्याने शेगांव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून त्यात त्यांनी शेजाऱ्यावर संशय व्यक्त केला आहे. गायगाव येथील शेतकरी सुदाम श्रीकृष्ण नागरे (३३) यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन सोंगणी करुन शेतातच सुडी लावली होती.

दरम्यान १७ ऑक्टोबरच्या रात्री ७.३० वाजे दरम्यान सदर सोयाबीनची सुडी कुणीतरी पेटवून दिली. यामुळे सुदामा नागरे यांचे ४५ हजाराचे नुकसान झाले. याबाबत त्यांनी शेगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली असून त्यात त्यांनी शेजारी जानराव हरिभाऊ सोनोने व मंगेश जानराव सोनोने या पिता-पुत्रावर संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ४३५, ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो हे का राजेश गाडेकर हे करीत आहेत.

Web Title: Soybeans in the fields were set on fire; Suspicion of a neighbor in buldhana khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.