शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर फेकले सोयाबीन, कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:45 IST

त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वा त शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर सोयाबीन व का पूस रस्त्यावर फेकून आंदोलन केले. स्वाभिमानीने अचानक  केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देकापूस, सोयाबीन प्रश्नी विदर्भ, मराठवाड्यात आंदोलन तीव्र  करणार - तुपकर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकर्‍यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा अत्यंत  कमी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांची सरकारकडून सर्रास  लूट केल्या जात आहे, त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वा त शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर सोयाबीन व का पूस रस्त्यावर फेकून आंदोलन केले. स्वाभिमानीने अचानक  केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर  कडाडून टीका करीत सोयाबीनला किमान ६ हजार तर कापसाला  किमान ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव न दिल्यास येत्या काळात  संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यात आंदोलन तीव्र करू, असा इशारा  यावेळी दिला. राज्य सरकारने यावर्षी सोयाबीनला ३ हजार ५0 रु पये हमी भाव जाहीर केला; मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांचे सोयाबीन  जेमतेम १८00 ते २ हजार रुपयांपर्यंत विकल्या जात आहे.  यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट  झाली आहे. त्यातच हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी  केल्या जात असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत् पादन खर्चसुद्धा निघणो कठीण झाले आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबर  रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी  राणा चंदन, भगवानराव मोरे, शे.रफिक, बबनराव चेके यांच्यासह  अन्य पदाधिकारी शेतकर्‍यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक दिली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शे तकर्‍यांनी सोबत आणलेले सोयाबीन व कापूस रस्त्यावर फेकून  आंदोलन केले. याप्रसंगी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, एकूण खाद्य  तेलापैकी सोयाबीन तेलाचा वाटा २.६0 टक्के आहे आणि भारत हा  सोयाबीन तेल आयात करणारा सर्वांत मोठा देश आहे. दोन वर्षां पूर्वी याच सोयाबीनला ३५00 ते ४५00 भाव होता. आज जेम तेम २ हजार ते २२00 रुपये भाव मिळत आहे. म्हणजे उत्पादन  खर्चही निघणे कठीण झाले आहे. गुजरातमध्ये कापसाला बोनस देतात, मग महाराष्ट्रात का नाही?  असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मागील दहा वर्षात  १४५.२ लाख टन म्हणजे ६९ हजार २00 कोटी रुपयांचे  सोयाबीन भारताने आयात केले आहे. सन २0१४-१५ व  २0१५-१६ या दोन वर्षात २२ हजार ३00 कोटी रुपयांचे  सोयाबीन आयात केले. गेल्या तीन वर्षात सोयाबीन मोठय़ा  प्रमाणात आयात झाल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर जाणीवपूर्वक  पाडल्या जात असल्याचे तुपकर म्हणाले. येत्या काळात सोयाबीन  व कापूस प्रश्नावर संपूर्ण विदर्भात आंदोलन पेटवू, असा इशारा  रविकांत तुपकर यांनी दिला. या आंदोलनात राणा चंदन,  भगवानराव मोरे, बबनराव चेके, शे.रफीक शे.करीम, पं.स.सदस्य  नंदिनी कल्याणकर, भारत वाघमारे, नितीन राजपूत, प्रदीप शेळके,  गजानन तायडे, पुरुषोत्तम तायडे यांच्यासह शेकडो शेतकरी  सहभागी झाले होते. 

‘टीका करण्यापेक्षा भाव द्या’!‘‘लोक सतत आमच्यावर टीका करतात. त्यांनी टीका केल्यापेक्षा  सोयाबीनला भाव द्यावा. आम्ही शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सतत रस् त्यावर लढणारे कार्यकर्ते आहोत. तथापि, मी व माझे सहकारी या पुढे ताकदीने ही लढाई लढून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार  आहे. १७ गावातील जळालेले ट्रान्सफॉर्मर आपण  अधिकार्‍यांकडून लावून घेतले. तूर घोटाळय़ातील व्यापार्‍यांवर  गुन्हे दाखल करुन घेतले तर उद्योगपतींचे कर्ज माफ करणार्‍या  सरकारला शेतकरी कृषी पंपाची सक्तीची वसुली करताना काहीच  वाटत नाही का’’, असा सवाल रविकांत तुपकर यांनी यावेळी उ पस्थित केला.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी