पिंपळगाव सराई, रायपूर परिसरात पेरणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST2021-06-19T04:23:30+5:302021-06-19T04:23:30+5:30
परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे, ते ...

पिंपळगाव सराई, रायपूर परिसरात पेरणीला सुरुवात
परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे, ते शेतकरी ट्रॅक्टरद्वारे पेरणी करत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे, ते शेतकरी तिफनीद्वारे पेरणी करत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस उशिरा आल्याने खरिपाची पेरणी उशिरा होत आहे. या परिसरात जवळपास ८० टक्के शेतकरी सोयाबीन या पिकाची पेरणी करताना दिसत आहेत. २० टक्के क्षेत्रावर तूर, उडीद, मूग व कपाशी पिकांची पेरणी केली जात आहे. पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामामध्ये मग्न झाले आहेत. सोयाबीन बियाण्याची यावर्षी शेतकरी वर्गाला टंचाई भासत असून, सोयाबीन बियाण्याचे प्रचंड भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गाचे पेरणीचे बजेट वाढले आहे. डिझेलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टरची पेरणी महागली आहे. पर्यायाने शेतकऱ्याला शेतीचा खर्च दीड पटीने वाढला आहे.