शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:32 IST

बुलडाणा जिल्ह्यात ५५ हजार ६८६ हेक्टर टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवार व सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे. ५५ हजार ६८६ हेक्टर टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.जिल्ह्यात मृग नक्षत्र पुर्णत: कोरडा गेल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खत, बियाणे खरेदीची घाई केली नाही. दरम्यान, मृग आणि आद्रा नक्षत्राच्या जोडावर २३ जून रोजी जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. आद्रा नक्षत्र लागल्यापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने खरिपाच्या लांबणीवर पडलेल्या पेरणीला सुरूवात झाली. २७ जूनपर्यंत खरिपाच्या एकुण नियोजीत ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ सात टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. दरम्यान, रविवारी व सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात एकूण ५५ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात सरासरी ७५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जळगाव जामोद तालुक्यात ४१ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी २ हजार २५०, संग्रामपूर तालुक्यात ४५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी १ हजार १८५, चिखली तालुक्यात ७३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ७००, देऊळगाव राजा तालुक्यात ४५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ९ हजार, मेहकर तालुक्यात ८७ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ५००, सिंदखेड राजा तालुक्यात ६५ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार, लोणार तालुक्यात ५९ हजार ९०० हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ३००, खामगाव तालुक्यात ६६ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ८ हजार, शेगाव तालुक्यात ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ६२९, मलकापूर तालुक्यात ४२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ६४३, मोताळा तालुक्यात ५० हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ८७१, नांदुरा तालुक्यात ४८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पाऊस थांबल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)१५ टक्के सोयाबीन पेरणीजिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख १५ हजार ३५ हेक्टर आहे. यावर्षी ४ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. नियोजीत क्षेत्रापैकी जिल्ह्यात १५ टक्के म्हणजे ३१ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी