शेतीसाठी दगडाने बापाचे डोके फोडले; कपाळावर दगड मारून केले जखमी
By अनिल गवई | Updated: May 17, 2024 15:59 IST2024-05-17T15:59:04+5:302024-05-17T15:59:21+5:30
शेतीत हिस्सा न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत केला

शेतीसाठी दगडाने बापाचे डोके फोडले; कपाळावर दगड मारून केले जखमी
खामगाव: पिता-पुत्रांतील शेतीचा वाद विकोपाला गेल्याने पुत्राने वडिलांचे डोके फोडले. ही घटना गुरुवारी रात्री खामगाव तालुक्यातील मांडका येथे घडली.
तक्रारीनुसार, सुभाष श्रीराम सातव (६५) गुरुवारी रात्री घरी असताना, त्यांचा गणेश नामक मुलगा मद्य प्राशन करून घरी आला. शेतीच्या हिश्श्याची मागणी करून अश्लील शिवीगाळ करायला लागला. वाद नको, म्हणून सकाळी या विषयावर बोलू असले म्हटले असता, गणेशने वडिलांच्या कपाळावर दगड मारून जखमी केले. शेतीत हिस्सा न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत केला. या प्रकरणी पोलिस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून पिंपळगाव राजा पोलिसांनी संशयित पुत्राविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पिंपळगाव राजा पोलिस करीत आहेत.