शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

काही भाग तहानलेलाच!

By admin | Updated: September 3, 2014 23:39 IST

खामगावातील विस्कळीत पाणीपुरवठा आंशिक सुरळीत; मात्र, अद्याप शहरातील बहुतांश भाग तहानलेलाच

खामगाव : गेल्या चौदा-पंधरा दिवसांपासून विस्कळीत असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिका प्रशासनाला अखेर आज यश आले. मात्र, अद्यापही शहरातील बहुतांश भाग तहानलेलाच आहे. त्यामुळे ऐन गौरी-गणपतीत शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गौरी- गणपतीची घरगुती स्थापना करणार्‍या नागरिकांसह काही गणेश मंडळांना महाप्रसादासाठी पाणी विकत घेण्याची वस्तुस्थिती शहराच्या अनेक भागात अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जलवाहिनीचा काही भाग पुरात वाहून गेला. त्यामुळे दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीपेक्षा शहरातील सर्वच भागात पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरासह फरशी, शिवाजी नगर, दाळ फैल, सिव्हील लाईन, शंकर नगर, चांदमारी, वामन नगर, हरिफैल या भागातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले. गौरी-गणपती सारख्या महत्वपूर्ण सणासुदीच्या काळात अनेक भागातील पाणी पुरवठा प्रभावित झाल्यामुळे गणेश मंडळांसह नागरिकांना चांगलेच हतबल व्हावे लागले. दरम्यान, आज बुधवारी फरशी, भोईपुरा, जैन मंदिर परिसरात पाणी पुरवठा सुरळीत झाला. मात्र, संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शंकर नगर, सिव्हील लाईन, चांदमारी, वामन नगर, हरिफैल, सर्मथ कॉलनी, गजानन कॉलनी, यशोधाम कॉलनी, एस.टी.डेपो मागील परिसरासह काही भागातील पाणी टंचाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.युद्धपातळीवर दुरुस्तीअतिदुर्गम भागात वाहून गेलेली पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाला चांगलेच प्रयत्न करावे लागले. पाऊस बंद झाल्यानंतर लागोपाठ २७ तास परिश्रम करून पालिका प्रशासनाने पाईपलाईनची दुरूस्ती केली. त्यामुळे आज पहाटे वामन नगर आणि घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचले. त्यानंतर टाईमटेबलनुसार विस्कळीत झालेल्या भागात पाणी पुरवठय़ासाठी आज प्राधान्य देण्यात आले. युध्द पातळीवर प्रयत्न करून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. काही भागात पाणी पोहोचले नाही, ही वस्तुस्थिती आहे. लवकरच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.- अशोकसिंह सानंदानगराध्यक्ष, खामगाव.सणासुदीच्या काळात नागरिकांना पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. ही दुर्देवी बाब आहे. तात्काळ पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. -गणेश मानेमाजी नगराध्यक्षअतिशय प्रतिकुल परिस्थितीत मुख्य पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली. २७ तास लागोपाठ काम करून पाईपलाईनची दुरूस्ती केली. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. - संजय मोकासरेउप अभियंता, न.प. खामगाव