शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडवा;  वरवट बकाल येथे काँग्रेसचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:28 IST

शनिवारी वरवट बकाल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाºयांनी डफडे बजाओ आंदोलन केले.

वरवट बकाल : येथील ग्रामीण रूग्णालयातील समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने यांनी १५ आॅगस्ट पासून वरवट बकाल येथे उपोषण सुरू केले. दरम्यान याच मागणीसाठी शनिवारी वरवट बकाल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाºयांनी डफडे बजाओ आंदोलन केले. भाऊ भोजने यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांना निवेदन दिले होते.आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे ग्रामीण रुग्णालय असून येथे मंजूर २७ पैकी १२ पदे रिक्त आहेत. गत अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नाहीत. रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात गवत वाढल्याने साप, विंचूसह विषारी कीटकांचा वावर वाढला आहे. रुग्ण कल्याण समितीची बैठक नाही. एक्सरे मशीन धूळखात आहे. २०१५ मिळालेला लाखो रूपयांचा निधी पडून आहे. औषध निर्माता नाही. ह्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी भोजने यांनी केली होती. १४ आॅगस्टपर्यंत समस्या न सोडविल्यास १५ आॅगस्ट पासून वरवट बकाल येथील बस स्थानकावर उपोषण करण्याचा इशारा भोजने यांनी दिला होत. गत ३ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई, रयत क्रांती आदी राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. शनिवारी सकाळी अभय मारोडे व कार्यकर्त्यांनी उपोषण मंडपात रक्तदान केले. संग्रामपूर तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेस पदाधिकाºयांनी शासनाविरुद्ध नारे देत डफडे बजाव आंदोलन केले. यावेळी कॉग्रेसनेते रमेशचन्द्र घोलप, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, कॉग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखडे, नारायण ढगे, अभय मारोडे, संतोष राजनकार, राजेस्वर देशमुख, संजय ढगे, संतोष टाकळकार, शेख मोहंमद, शेख अशपाक, मोहन रोंदंळे, ज्ञानदेव घायल, राजू राठोड, दुर्गासिंग सोळंके, प्रल्हाद दातार आदी डफडे बजाओ आंदोलनात सहभागी झाले.(वार्ताहर) 

टॅग्स :khamgaonखामगावagitationआंदोलनcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस