सामाजिक समीकरणे सपशेल ‘फेल’
By Admin | Updated: October 20, 2014 00:11 IST2014-10-20T00:11:13+5:302014-10-20T00:11:13+5:30
चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राहुल बोंद्रे विजयी.
सामाजिक समीकरणे सपशेल ‘फेल’
सुधीर चेके पाटील /चिखली (बुलडाणा)
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या रविवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये मतदारांनी विकासकामांना प्राधान्य देत राहुल बोंद्रेंच्या पदरात पुन:श्च आमदारकीचे माप भरभरून टाकले आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघाला जातीय समिकरणांचे कोंदण आहे. या मतदारसंघाला मराठाबहुल समजले जाते. या खालोखाल या मतदारसंघात राजपूत समाजाचे प्राबल्य आहे. मात्र, या दोनही बहुसंख्याक समाजाच्या उमेदवारांना तिसर्या आणि चौथ्या स्थानावर जावे लागले. दुसरीकडे अल्पसंख्याक समजल्या जाणार्या समाजातून आलेले विजयी उमेदवार राहुल बोंद्रे आणि त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सुरेशआप्पा खबुतरे यांनी मिळविलेली मते एकूण मतदानाच्या ६१ टक्क्क्य़ांपर्यंत जातात. यावरून मतदारांनी सामाजिक समीकरणे दुय्यम ठरव त विकासकामांना आणि विकासाशीच बांधील असलेल्यांना संधी देण्याचे ठरविले होते, असे दिसते.
गेल्या पाच वर्षांच्या काळामध्ये आमदार राहुल बोंद्रे यांनी मतदारसंघात जवळपास ५00 कोटींची विकासकामे पूर्ण केल्याचा दावा केला होता. विरोधकांनी हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही, असे दिसून येते. सुरेशआप्पा खबुतरे यांना या मतदारसंघामध्ये असलेले भाजपचे नेटवर्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा जमेच्या बाजू पुरेपूर कॅश करता आल्या नाहीत. तरीही सामाजिक समीकरणे विरोधात असताना त्यांनी मिळविलेली मते लक्षणीय ठरतात.
मराठा समाजामध्ये धृपदराव सावळे आणि राजपूत समाजामध्ये डॉ. प्रतापसिंह राजपूत हे दोन्ही नेते बलाढय़ आहेत. त्यांच्या शब्दाला समाजामध्ये किंमतही आहे. असे असताना या दोन्ही समाजधुरिणांना का नाकारले, याचे आत्मचिंतन या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ने त्यांनी करणे गरजेचे ठरले आहे.