एनएसएसमधून सामाजिक बांधिलकी निर्माण होते - गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:33+5:302021-09-25T04:37:33+5:30

ते स्थानिक श्रीमती सिंधुताई जाधव महाविद्यालयामध्ये २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता ...

Social commitment is created from NSS - Gaikwad | एनएसएसमधून सामाजिक बांधिलकी निर्माण होते - गायकवाड

एनएसएसमधून सामाजिक बांधिलकी निर्माण होते - गायकवाड

ते स्थानिक श्रीमती सिंधुताई जाधव महाविद्यालयामध्ये २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता हा उपक्रम आभासी पद्धतीने राबविण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस. पी. एम. महाविद्यालय चिखली येथील प्रा. डॉ. नागेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. लाहोरकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये असे सांगितले की, विद्यार्थ्यांनी नियमाचे आणि वेळेचे पालन करून आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडण्यास स्वयंसेवकाचे योगदान समाजासाठी महत्त्वाचे ठरते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. आर. शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. आर. जी. सुरलकर, प्रा. डॉ. एस. टी. कुटे, प्रा. डॉ. बी. डब्ल्यू. सोमटकर, प्रा. डॉ. पी. आर जूनघरे प्रा. मोहिते, प्रा. रहाटे, प्रा. आढाव, प्रा. उबाळे, प्रा. डॉ. जैताळकर, प्रा. डॉ. एस. एम. खडसे, प्रा. डॉ. व्ही. आर. मोरे, प्रा. डॉ. एस. एम. पवार, प्रा. गाडेकर, प्रा. संभाजी गवळी, प्रा. डॉ. देशमुख तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन साक्षी ढगे हिने केले, तर आभार प्रदर्शन रूपाली लांडे हिने केले.

Web Title: Social commitment is created from NSS - Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.