गळ्यातील चेन हिसकावून चोरटे फरार

By Admin | Updated: June 26, 2015 01:32 IST2015-06-26T01:32:58+5:302015-06-26T01:32:58+5:30

अज्ञात दोन चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना.

The snatcher snatches the chain and snatches away | गळ्यातील चेन हिसकावून चोरटे फरार

गळ्यातील चेन हिसकावून चोरटे फरार

खामगाव : अकोला महामार्गावरील अग्रवाल पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या अँम्ब्युलन्सचालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञात दोन चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना २४ जून रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गजानन सखाराम जोगदंड असे चालकाचे नाव आहे. २४ जून रोजी रात्री ९ वाजता त्यांनी अँम्ब्युलन्स अकोला मार्गावरील टेंभूर्णा फाट्याजवळील अग्रवाल पेट्रोल पंपावर उभी केली व गाडीत बसून आराम करीत असताना अचानक दोन अज्ञात इसम येऊन त्यांच्या गळ्यातील ८0 हजार रुपये किमतीची ४0 ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The snatcher snatches the chain and snatches away