शाळेत विद्यार्थिनीला सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:57 IST2017-07-21T00:57:39+5:302017-07-21T00:57:39+5:30

सिंदखेडराजा : चक्क शाळेतच वर्ग सुरू असताना एका विद्यार्थिनीला साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये १९ जुलैला सर्पदंश झाल्याची घटना घडली.

Snake bite in school | शाळेत विद्यार्थिनीला सर्पदंश

शाळेत विद्यार्थिनीला सर्पदंश

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील काही माध्यमिक शाळांची अवस्था दयनीय झालेली असून, चक्क शाळेतच वर्ग सुरू असताना एका विद्यार्थिनीला साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये १९ जुलैला सर्पदंश झाल्याची घटना घडली.
साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये वर्ग १० वीत शिक्षण घेत असलेल्या रेखा भगवान चौधरी हिला शाळा सुरु असताना सापाने सर्पदंश केला. दरम्यान, तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले.
तेथून बुलडाणा येथे हलविण्यात आले. तिची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी शाळेतील सुविधेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात ४० हून अधिक माध्यमिक विद्यालय असून, असंख्य शाळेत बसविलेल्या फरशा उखडल्या आहेत.

Web Title: Snake bite in school