शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शेतक-यांना एसएमएसचा फायदा

By admin | Updated: January 28, 2016 00:59 IST

१ लाख ७0 हजार शेतक-यांची झाली योजनेअंतर्गत नोंदणी.

खामगाव : हवामानातील बदलामुळे कृषी क्षेत्रात सध्या काहीसी चिंता व उत्पादनात अनियमितता आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हवामान बदल तथा पीकांवर येणार्‍या कीडीच्या प्रादुर्भावाबाबत अचूक माहिती देण्याच्या दृष्टीने जून २0१५ पासून किसान एसएमएस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या कक्षेत जिल्ह्यातील ३१ टक्के क्षेत्री आता आले आहेत. परिणामी शेतकर्‍यांना पीक पाण्याविषयी सविस्तर व अचूक माहिती थेट पोहोचत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातही आता अधुनिकीकरणाने प्रवेश केला आहे. गेल्या दोन वर्षापासून हवामानातील बदलामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अभूतपूर्व गारपीट, अवकाळी पाऊस अवर्षण असे चक्र गेल्या काही वर्षापासून सुरू झाल्याने शेतीक्षेत्र प्रभावीत झाले आहे. त्यातच योग्य वेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला खास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावल्या जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हवामान बदलाची अचूक माहिती तथा पीकांवर येणार्‍या किडीचे योग्य वेळी व्यवस्थापन केले जावे यासाठी थेट शेतकर्‍यांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यास पाच लाख ४८ हजारांच्या आसपास शेतकरी असून त्यापैकी एक लाख ७0 हजार ८६२ शेतकर्‍यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची या उपक्रमातंर्गत आतापर्यंत कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात नोंद करण्यात आली आहे. जिल्हयातील एकूण शेतकर्‍यांशी तुलना करता जवळपास ३१ टक्के शेतकरी यामध्ये समाविष्ट झाले आहे. त्यांना आता कृषी विषयक सल्ला थेट एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे.