शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या गाडीतून निघाले धुराचे लोट...; खामगाव शेगाव रोडवरील घटना

By अनिल गवई | Updated: April 19, 2024 22:14 IST

खामगाव शहर अवघे पाच किलोमीटर दूर असतानाच गाडीतून धुराचे लोट निघाले. चालकाने प्रसंगावधान राखत, तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले अन्...

खामगाव : दुपारी ४ वाजता शेगाव येथून खासगी प्रवासी गाडी खामगावसाठी निघाली. खामगाव शहर अवघे पाच किलोमीटर दूर असतानाच गाडीतून धुराचे लोट निघाले. चालकाने प्रसंगावधान राखत, तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. गाडीतील प्रवासी लगेच गाडीबाहेर आले. गाडी काही केल्या बंद होईना. तितक्यात चालकाने इंजिन आणि रेडिएटरवर पाण्याचा मारा केला. त्यानंतर वाहनातून धुराचे लोट कमी झाले. गाडीही बंद झाली. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला.सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी एकादशी असल्यामुळे खामगाव येथून शेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. गुरुवारी आणि एकादशीला भाविकांची गर्दी जास्त असल्यामुळे भाविकांना खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. शुक्रवारीदेखील शेगाव येथून वाहन (एमएच-२८, एएन-१३०४) खचाखच प्रवासी घेऊन खामगावच्या दिशेने निघाले. खामगाव शहर काही अंतरावरच असताना एक महाविद्यालय आणि हनुमान मंदिराजवळ या गाडीतून वेगळाच आवाज निघत काळा धूर निघायला लागला. हा प्रकार गाडीतील महिला आणि प्रवाशांच्या निदर्शनास आला. त्यामुळे गाडीत एकच कल्लोळ उडाला.या कल्लोळात प्रसंगावधान राखत चालकाने गाडी बाजूला घेऊन प्रवाशांना खाली उतरविले. गाडी बंद करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, गाडी बंद होत नसल्याने दुसरा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी चालकही वाहनाबाहेर पडला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीतून पाणी घेत, इंजिन आणि रेडिएटरवर पाण्याचा मारा केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर काळ्या धुराचे लोट आणि गाडीचा आवाज बंद पडला. आग विझताच अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला, तर वाहनातील एका महिला प्रवाशाने दैव बलवत्तर म्हणून जीव वाचल्याचा अनुभव ‘लोकमत’कडे कथन केला. रस्त्याने जात असलेल्या वाहनातील काही प्रवासी आणि चालकही प्रसंगी धावून आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला -प्रवासी वाहनात शेगाव येथून सुमारे १२ ते १४ प्रवासी बसले होते. यामध्ये काही महिलांचा आणि बालकांचाही समावेश होता. गाडीतून धुराचे लोट निघाल्यानंतर काहींनी जिवाच्या आकांताने बाहेर पडण्यासाठी खटाटोप केला.

टॅग्स :khamgaonखामगावcarकारfireआग