११वीच्या अभ्यासक्रमात बुलडाण्याचा मातीचा गंध!

By Admin | Updated: June 12, 2016 02:48 IST2016-06-12T02:48:59+5:302016-06-12T02:48:59+5:30

११ वीच्या अभ्यासक्रमात सदानंद देशमुख, अजीम नवाज राही यांच्या कवितांचा समावेश.

Smell of bulge in 11th syllabus! | ११वीच्या अभ्यासक्रमात बुलडाण्याचा मातीचा गंध!

११वीच्या अभ्यासक्रमात बुलडाण्याचा मातीचा गंध!

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता ११ वीच्या नवीन पाठय़पुस्तकात प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांच्या 'सोनं होऊन जगावं' आणि अजीम नवाज राही यांच्या 'झाडे सडकेलगत उगवलेली'या कवितांचा समावेश केला गेला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावीचे मराठी भाषेचे पुनर्रचीत पाठय़पुस्तक तयार करताना विद्यार्थ्यांंचा सर्वांंगीण विकासावर भर दिला. यासाठी अभिजात साहित्याची ओळख, शाश्‍वत मूल्यांची जोपासना, उत्तम नागरिकत्वाची शिकवण व पर्यावरणाशी मैत्री ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून पाठय़पुस्तकात स्थानिक ते जागतिक घडामोडींचा उहापोह केला असून विज्ञान, तंत्रज्ञान आणि भाषा या त्रिसूत्रींची सांगड घातली आहे. शेतकर्‍यांच्या भकास जीवनात आशावादाची पेरणी करणारी बारोमास कादंबरी प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांच्या वास्तवदग्ध, सकस लेखणीतून अवतरली. मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार या कादंबरीच्या पदरात येवून पडला. विद्यापीठस्तरावर तहान, बारोमास या कादंबर्‍यांचा अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
सोबतच अजीम नवाज राही यांच्या व्यवहाराचा काळा घोडावर राज्य आणि देशपातळीवरच्या मातब्बर पुरस्कारांचा अक्षरश: वर्षाव झाला. त्यात अमेरिकेतील फाऊंडेशन आणि भारतातील केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबईचा वाड्मयीन क्षेत्रातला अत्यंत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय लेखनाचा कवी केशवसूत पुरस्कार यांचा विशेष समावेश होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १0 च्या अभ्यासक्रमात त्यांच्या ह्यपडझड मोहोल्ल्याचीह्ण या कवितेचा समावेश केला. सध्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठ अमरावती, गोंडवाणा गडचिरोली विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्राच्या अशा पाच विद्यापीठात अजीम नवाज राही यांच्या कवितांचा विद्यापीठ स्तरावर समावेश झाला. कविता आणि निवेदन महाराष्ट्राच्या या दोन क्षेत्रात स्वत:च्या नावाचा ठसा उमटविणारे अजीम नवाज राही आणि त्यांचा शब्दप्रवास बुलडाणा जिल्ह्यासाठी भूषणावह ठरला. इयत्ता ११ वीच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल अजीम नवाज राही आणि प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांच्यावर वाड्मयीन क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Smell of bulge in 11th syllabus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.