छोटे पक्ष झाले निवडणुकीतून बाद
By Admin | Updated: August 28, 2014 00:50 IST2014-08-27T23:59:23+5:302014-08-28T00:50:44+5:30
बुलडाणा विधानसभा निवडणुकीतुन बाद झाल्याचे चित्र.

छोटे पक्ष झाले निवडणुकीतून बाद
बुलडाणा : प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाव्यतिरिक्त अनेक छोट्या -मोठय़ा पक्षांचे उमेद्वार निवडणूक रिंगणात उतरत होते. कधी पक्षाचे नावही ऐकले नाही, असे पक्ष प्रचारात बोलबाला करायचे; मात्र हे छोटे पक्ष आता निवडणुकातून बाद झाल्याचे दिसते.
सत्तरच्या दशकात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत जनसंघ शेकाप रिपाइं हे प्रमुख चार पक्ष असायचे. त्यांच्यासोबत एखाददोन अपक्ष अथवा इतर पक्षाचा उमेद्वार राहायचा. १९७१ च्या निवडणुकीनंतर अनेक छोट्या पक्षांचा उदय झाला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या १९९१ च्या लोकसभा व १९९0 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक छोट्या पक्षांचे उमेद्वार रिंगणात होते. ज्या पक्षाचे कधी नावही मतदारांनी ऐकले नाही असे पक्ष या निवडणुकीत आपले भाग्य अजमावत होते. यामध्ये जनपरिषद, भाकस, जनता पार्टी, दूरदश्री पार्टी, वि.प्र पार्टी या पक्षांचा समावेश होता. जनपरिषद आणि वि.प्र पार्टीने बर्यापैकी मते घेतली होती. इतर उमेद्वार अगदी दोन किंवा तीन अंकी मतांच्या आकडेवारीवरच स्थिरावले होते.
१९९९ च्या निवडणुकीपासून मात्र लहान पक्षाच्या उमेद्वारांची संख्या कमी होत गेली. आता नव्याने काही पक्ष आले आहेत; मात्र त्यांचा प्रभाव तेवढा दिसत नाही.