पिडीत महिलेला सहा लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 13:52 IST2017-06-10T13:52:29+5:302017-06-10T13:52:29+5:30

येथील पिडीत महिलेला एक लाख रूपयांची मदत दिलीअसून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्रीराजकुमार बडोले यांनी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात केली.

Six women help the victim | पिडीत महिलेला सहा लाखांची मदत

पिडीत महिलेला सहा लाखांची मदत

गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे राजकुमार बडोले यांचे आश्वासन
बुलडाणा : रूईखेड मायंबा येथील पिडीत महिलेला एक लाख रूपयांची मदत दिली
असून, आणखी पाच लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री
राजकुमार बडोले यांनी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात केली.
 रूईखेड मायंबा येथील एका महिलेला गावातीलच काही नागरिकांनी मारहाण करून
धिंड काढली होती. याप्रकरणी चर्मकार समाजाच्या विविध संघटनांनी आंदोलन
करीत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पिडीत महिलेची शनिवारी सकाळी
जिल्हा सामान्य रूग्णालयात भेट घेतली. यावेळी महिलेनी तिला झालेल्या
मारहाणीची माहिती दिली. गावातीलच काही नागरिकांनी मारहाण केली असून,
आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे सदर महिलेने बडोले यांना
सांगितले. त्यांनी पिडीतेला ॲट्रासिटी कायद्यातंर्गत विविध कलमान्वये
दाखल गुन्ह्याप्रमाणे प्राथमिक मदतीचा एक लक्ष रूपयांचा धनादेश दिला.
यावेळी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांनुसार कडक कारवाई
करण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री यांनी दिल्या. तिक्रिया देताना
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले, ही घटना दुर्देवी असून
अशाप्रकारच्या घटना घडणे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. जिल्हा
प्रशासनाने अशा घटनांवर वचक निर्माण करण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई
करावी. तसेच समाजानेही जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष
करून जातीय सलोखा अबाधीत ठेवावा. याप्रकरणी शासन सर्वतोपरी मदत पिडीत
कुटूंबाला करेल.
   याप्रसंगी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी. एल थुल, जि. प
अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे,  विजयराज
शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षक
शशीकुमार मीना,  सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक वडपुते,
प्र. सहाय्यक आयुक्त निलेश यावलीकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज
मेरत,अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Six women help the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.