बस-इंडिगो कार अपघातात सहा जण जखमी

By Admin | Updated: April 8, 2015 01:54 IST2015-04-08T01:54:34+5:302015-04-08T01:54:34+5:30

शाराजवळील वळण रस्त्यावरील घटना.

Six people injured in Bus-Indigo car crash | बस-इंडिगो कार अपघातात सहा जण जखमी

बस-इंडिगो कार अपघातात सहा जण जखमी

लोणार (जि. बुलडाणा): लोणार तालुक्यातील शाराजवळील वळण रस्त्यावर एसटी बस व इंडिगो कारची धडक होऊन सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी सकाळी १0.१५ वाजतादरम्यान घडली. लोणार बसस्थानकावरून सकाळी १0 वाजतादरम्यान एम.एच.२0 बी.एल.0६२३ क्रमांकाची परतूर अकोला एसटी बस मेहकरकडे निघाली. दरम्यान, शाराजवळील वळण रस्त्यावर सुलतानपूरकडून लोणारकडे भरधाव वेगाने येणार्‍या एम.एच.२२ यू.७१७७ क्रमांकाच्या इंडिगो कारची व परतूर अकोला एसटी बसची जबर धडक झाली. या अपघातात इंडिगो कारमधील परभणी येथील समाबी शेख (३0), सायमाबी (२८), जमीलाबाजी (२५), मो. अशरफ (३२), फातेमाबी (४0), हारुणभाई हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, येथील नंदू डव्हळे, प्रवीण व्यवहारे, दिनेश डव्हळे व राजेश पारे यांच्या मदतीने सर्व जखमींना मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी रात्री उशिरापर्यंंंत पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

Web Title: Six people injured in Bus-Indigo car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.