सोने चोरी करणा-या सहा जणांना अटक
By Admin | Updated: January 22, 2017 03:00 IST2017-01-22T03:00:21+5:302017-01-22T03:00:21+5:30
देऊळगाव राजा तालुक्यातील घटना; चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी.

सोने चोरी करणा-या सहा जणांना अटक
देऊळगाव राजा, दि. २१- शहरातील जुना जालना रोडवरील एका घरात लाखो रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम चोरी प्रकरणात पोलिसांनी गावातीलच सहा आरोपींना अटक केली. शनिवारला त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चोरट्यांना अटक केल्यानंतर आणखी चोर्यांचा शोध लागण्याची शक्यता आहे.
शहरातील धुंडीराज मठ परिसरात राहणारे वसंत लक्ष्मण पिंगळे यांच्या घरी चोरट्यांनी नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख २४ हजार मुद्देमाल चोरुन नेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर ठाणेदार विजयसिंग राजपूत यांनी तपास पथकाच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार आरोपी लक्ष्मण धारेगावकर, सम्राट अशोक खांडेभराड, परमेश्वर नंदुलाल कोकणे, विक्की संजय भालेराव यांना तत्काळ १९ जानेवारीला ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने सहा आरोपींना दोन दिवस कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला.