जुगार खेळताना सरपंचासह ६ जणांना अटक
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-26T23:49:37+5:302014-06-27T00:27:47+5:30
शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या अळसणा गावातील घटना

जुगार खेळताना सरपंचासह ६ जणांना अटक
आळसणा: शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या अळसणा गावात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जी. श्रीधर यांना मिळाल्यांतर आज गुरुवारी पथकाने टाकलेल्या धाडीत आळसणा येथील सरपंच साहेबराव लांजुडकर यांच्यासह सहा जणांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.
आळसणा येथे काही दिवसापासुन जुगारअड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जी. श्रीधर यांना मिळाल्यानंतर गुरुवारी पथकाने अळसणा गावातील जुगार अड्यावर धाड टाकुन मुद्देमालासह सहा जणांना ताब्यात घेतले. या आरोपींमध्ये आळसणा येथील सरपंच साहेबराव गोविंदराव लांजुडकर यांच्यासह शेख जब्बार, अनिसखा, मुस्तफाखा, सहदेव जगलु पहुरकर, सर्व राहणार आळसणा आणि मोहनलाल पाडीया रा.शेगाव हे आहेत. जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने आरोपींकडून ५ हजार ५७0 रुपये रोख, ताशपत्ते व साहित्य असा ५ हजार ६00 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई प थकाचे पो.हे.कॉ.संजय कांडेले, गजानन बोरसे, श्रीकांत चिंचोले, गणेश शेळके यांनी केली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पो.स्टे.ला उपरोक्त आरोपींच्याविरुध्द कलम १२ अ मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली.