Six more die, 1,018 new positives | आणखी सहा जणांचा मृत्यू, १०१८ नवे पाॅझिटिव्ह

आणखी सहा जणांचा मृत्यू, १०१८ नवे पाॅझिटिव्ह

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून १८ एप्रिल राेजी आणखी सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तसेच १०१८ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून ४ हजार ४१४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ १२०७ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़ उपचारादरम्यान पि. काळे, ता. जळगाव जामोद येथील ६५ वर्षीय महिला, संगम चौक बुलडाणा येथील ६८ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी ता. मेहकर येथील ७२ वर्षीय महिला, वालसावंगी जि. जालना येथील ६० वर्षीय पुरुष, साखळी ता. बुलडाणा येथील ७५ वर्षीय महिला व देविवाडी ता. नांदुरा येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर १५, बुलडाणा तालुका कोलवड २, हतेडी २, धाड ७, वरवंड १२, रायपूर ४, मातला ८, सोनगाव ५, मोताळा शहर २, मोताळा तालुका धा. बढे १०, किन्हेळा ४, सारोळा मारोती ४, जयपूर २, वडगाव २, खामगाव शहर : ४२, खामगाव तालुका सुटाळा २, लाखनवडा ३, शेगाव शहर ४४, शेगाव तालुका पहुरजिरा २, खेर्डा ५, जळंब १, कालखेड २, चिखली शहर ८३, चिखली तालुका शेलूद ५, सवणा ३, मेरा बु ८, खंडाळा २, सवडत २, अंतरी खेडेकर २४, आंधई ३, सातगाव ४, चंदनपूर ३, नायगाव ४, रोहडा २, कनारखेड ३, दहिगाव २, असोला ३, अंचरवाडी २, काटोडा २, खैरव २, पळसखेड नाईक ४, मलकापूर शहर ४७, मलकापूर तालुका उमाळी १७, माकणेर ५, दाताळा २, धरणगाव ५, भाडगणी २, मोरखेड २, नरवेल ५, दे. राजा शहर ५४, दे. राजा तालुका खैरव ९, सिनगाव १०, शिवनी आरमाळ ३, उंबरखेड ३, दे. मही ६, पिंपळगाव ३, कुंबेफळ २, बायगाव २, सावखेड भोई ३, बुटखेडा २, जवळखेडा २, बोराखेडी बावरा २, मेहुणा राजा २, आसोला जहा ४, टकारखेड वायाळ २, सरंबा २, सिं. राजा शहर ३९, सिं. राजा तालुका साखरखेर्डा १६, शेंदुर्जन ६, हनवतखेड ४, खामगाव १, सायाळा २, बाळसमुद्र २, माळ सावरगाव ८, सावखेड तेजन २, पिंपळखुटा ३, आंचली २, केशव शिवणी २, राहेरी २, बोरगाव २, मलकापूर पांग्रा ५, ढोरकी २, मेहकर शहर २१, मेहकर तालुका : हिवरा आश्रम ३, दे. माळी ३, भालेगाव २, ब्रह्मपुरी ४, वेणी ३, संग्रामपूर तालुका वरवट २, बोडखा १, रुधाना १,

जळगाव जामोद शहर ७, जळगाव जामाेद तालुका पि. काळे २१, झाडेगाव २, भेंडवळ ११, नांदुरा शहर ११, नांदुरा तालुका महाळुंगी ४, आलमपूर ३, टकारखेड १०, लोनवडी २, तरवाडी ३, लोणार शहर १७, लोणार तालुका बिबी ३, कि. जत्तू २, देऊळगाव कोळ ३, सोमठाना २, पिंपळनेर २, कोयाळी १५, धानोरा येथील ११ जणांचा समावेश आहे़

६ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू

आज रोजी ५ हजार २८० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ५२ हजार २९९ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ४५ हजार ५८६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ६ हजार ३७९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ३३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Six more die, 1,018 new positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.