धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस सहा महिने शिक्षा
By Admin | Updated: October 17, 2014 23:53 IST2014-10-17T23:53:16+5:302014-10-17T23:53:16+5:30
शेगाव येथील न्यायालयाचा निकाल.

धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस सहा महिने शिक्षा
शेगाव (बुलडाणा) : धनादेश अनादर प्रकरणी एका आरोपीस शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा आणि ४५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल न्या.ए.एस. लांजेवार यांनी गुरूवार १६ ऑक्टोबर रोजी दिला. या प्रकरणाची हकीकत अशी आहे की, शेगाव येथील भारतीय ऑईल मिलतर्फे मालक रमेश गौरीशंकर भरतीया यांनी पहुरजिरा येथील सहदेव पुंडलिक बेलोकार यांचेविरूध्द शेगाव न्यायालयात कलम १३८ निगोशिएबल इस्टूमेंट अँक्टनुसार फौजदारी प्रकरण दाखल केले . सहदेव पुंडलिक बेलोकार यांनी भरतीया ऑईल मिलकडून रू.२२ हजार ६00 ची ढेप १२ नोव्हेंबर 0५ रोजी उधारीने विकत घेतली होती. त्याबद्दल आरोपीने २२ फेब्रुवारी 0७ रोजी खामगाव अर्बन को-ऑप. बँक लि. खामगावचा धनादेश दिला होता. सदरहरू धनादेश हा आरोपीचे खात्यात अपूर्ण असल्यामुळे वटविल्या गेला नाही. त्यामुळे भरतीया ऑईल मिलतर्फे रमेश गौरीशंकर भरतीया यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार बेलोकार विरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने न्यायालयाने सहा महिन्याची साधी कैद व रू.४५ हजार दंड भरण्याचा निकाल दिला. दंडाच्या रकमेतून रू.४0 हजार फिर्यादी रमेश भरतीया यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेशही दिला. याप्रकरणी रमेश भरतीया यांची बाजू अँड.पुरूषोत्तम डांगरा व अँड.मनोज मल यांनी न्यायालयात मांडली.