अपघात करणा-यास सहा महिन्यांचा कारावास

By Admin | Updated: August 7, 2015 01:11 IST2015-08-07T01:11:19+5:302015-08-07T01:11:19+5:30

बुलडाणा प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांचे आदेश.

Six months imprisonment for accident | अपघात करणा-यास सहा महिन्यांचा कारावास

अपघात करणा-यास सहा महिन्यांचा कारावास

बुलडाणा : बोरखेड शिवारात ट्रॅक्टर ट्रॉली पलडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना १२ जानेवारी २०१३ मध्ये घडली होती. या प्रकरणी बुलडाणा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.डी. सोनी यांनी आरोपी कैलास रामदास बावस्कर (रा. बोरखेड) याला सहा महिने तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ६ आॅगस्ट रोजी सुनावली.
बोराखेडी शिवारात दगडीच्या रस्ता या ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉली निष्काळजीपणे चालवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू आणि एक जखमी झाल्याची घटना १२ जानेवारी २०१३ रोजी घडली होती. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये कैलास बावस्कर (रा. बोरखेड) याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर नऊ साक्षीदार व प्रत्यक्षदर्शीदारांची साक्ष पुराव्याच्या आधारे चालू असलेल्या खटल्यात गुरुवारी बुलडाणा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.डी. सोनी यांनी आरोपीला सदर शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षाकडून सरकारी वकील मोहंमद बशीर मोहम्मद नशीर यांनी काम पाहिले.

Web Title: Six months imprisonment for accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.