रेल्वेमध्ये चोरी करणा-यास ६ महिन्यानंतर अटक
By Admin | Updated: May 23, 2017 17:56 IST2017-05-23T17:56:16+5:302017-05-23T17:56:16+5:30
अट्टल चोरट्यास अटक करण्यात शेगाव रेल्वे पोलिसांना ६ महिन्यानंतर यश मिळाले.

रेल्वेमध्ये चोरी करणा-यास ६ महिन्यानंतर अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : रेल्वे प्रवाश्याचा मोबाईल लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात शेगाव रेल्वे पोलिसांना ६ महिन्यानंतर यश मिळाले. सेंथला (ओरिसा) येथील संदीप राजेंद्र अग्रवाल (वय ३०) हे १ डिसेंबर रोजी मुंबई-हावडा मेलने प्रवास करीत असताना त्यांचा ७ हजार ६०० रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला होता. याप्रकरणी संदीप अग्रवाल यांनी शेगाव रेल्वे पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. दरम्यान शेगाव रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत असताना चोरट्याचा सुगावा लावत २१ मे रोजी मलकापूर येथील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या सुजीत अजीतसिंग भोंड (वय २०) या चोरट्यास प कडण्यात यश मिळविले. पकडण्यात आलेला सुजीत भोंड हा अट्टल चोरटा असून त्याचेविरुध्द मलकापूर शहर व ग्रामीण पोलिस स्टेशनला विविध ठिकाणी झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती शेगाव रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान रेल्वेतील चोरीप्रकरणी सुजीत भोंड यास अटक करण्यात आल्याने रेल्वेतील अनेक चोरींचा उलगडा होवू शकतो, असा विश्वास शेगाव रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.