शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:06 IST

तसेच मन प्रकल्पाचा जलसाठा ९२.६१ टक्यावर पोहचला आहे. पाऊस सुरूच असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने दोन मोठे आणि सहा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. खकडपूर्णा प्रकल्पात ८४.३४ टक्के जलसाठा असून पेनटाकळी प्रकल्पाचा जलसाठा ७८.७७ टक्यांवर पोहचला आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावळी १०० टक्यांवर पोहचले असून या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच मन प्रकल्पाचा जलसाठा ९२.६१ टक्यावर पोहचला आहे. पाऊस सुरूच असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे.जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कुठे तुरळक, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. २९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले. त्यामध्ये पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावणी या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे २० से.मी उघडण्यात आले आहे. नदीपात्रात १९.४६ घनमिटर प्रती सेकंट इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. खडकपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच वक्रद्वारे ३० से.मी न उघडण्यात आली आहेत.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशाराजिल्ह्यातील दोन मोठ्या आणि सहा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहेत. त्यामुळे, नद्या दुथळी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाउस सुरू असल्याने जलपातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७.२ मिमी सरासरी पाउस झाला आहे. खामगाव तालुक्यात सर्वाधिक १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण