शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प  ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:29 IST

गुरूवारी झालेल्या जोरदार पावसाने दोन मोठे आणि सहा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या जोरदार पावसाने दोन मोठे आणि सहा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. खकडपूर्णा प्रकल्पात ८९.७३ टक्के जलसाठा असून पेनटाकळी प्रकल्पाचा जलसाठा ८६.९४ टक्यांवर पोहचला आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावळी १०० टक्यांवर पोहचले असून या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच मन प्रकल्पाचा जलसाठा ९८.७५टक्यावर पोहचला आहे.जिल्ह्यात गुरुवारी अनेक तालुक्यामध्ये जोरदार पाउस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे.११ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले. त्यामध्ये पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावणी या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे तीनवक्रद्वारे २० से.मी उघडण्यात आले आहे. नदीपात्रात ६०.३३ घनमिटर प्रती सेकंट इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. खडकपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन वक्रद्वारे ३० से.मी न उघडण्यात आली आहेत.तसेच मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशाराजिल्ह्यातील दोन मोठ्या आणि सहा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहेत. त्यामुळे, नद्या दुथळी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाउस सुरू असल्याने जलपातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ३०.०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प