बुलडाणा येथे महसूल अधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:07+5:302021-02-05T08:34:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : रेती माफियांनी उमरखेड जि. यवतमाळ येथील नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा बुलडाणा ...

Sit-in agitation of revenue officers at Buldana | बुलडाणा येथे महसूल अधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

बुलडाणा येथे महसूल अधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : रेती माफियांनी उमरखेड जि. यवतमाळ येथील नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा बुलडाणा येथे तीव्र निषेध करण्यात आला. मंगळवारी महसूल अधिकाऱ्यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर रेती माफियांनी प्राणघातक हल्ला चढविला. याप्रकरणी आरोपीविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यातील महसूल अधिकारी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात आरडीसी दिनेश गिते, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, अभिजित नाईक, तहसीलदार रूपेश खंडारे, तहसीलदार शीतल रसाळ, स्वप्नाली डोईफोडे, पंकज मगर, श्यामला खोत, अश्विनी जाधव, पुष्पा डाबेराव, सुनील आहेर, पी.के. करे, अनंता पाटील, व्ही.के.पाटील, सुनील शेळके, भिकाजी घुगे, अनिल माचेवाड आदी महसूल अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

---

चौकट..

सामूहिक रजा आंदोलन

-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनासाठी महसूल अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. यामध्ये जिल्ह्यातील ९७ महसूल अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील २१ तहसीलदार, ६४ नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी यांचा या सामूहिक रजा आंदोलनात सहभाग होता.

फोटो:

---------

Web Title: Sit-in agitation of revenue officers at Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.