शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने शिवरायांचे तीनही वंशज एकाच विचारपीठावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 03:29 IST

सिंदखेडराजा : महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन वशंज  एकाच वेळी मातृतिर्थावरील ४२0 व्या राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवास  आवर्जून हजर होते. कौटुंबिक कार्यक्रमासाठी गाठी भेटी होत असल्या तरी सामाजिक  विचारांचे मंथन होत असलेल्या या कार्यक्रमात प्रथमच त्यांचे एकत्र येणे  ही  महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना    ठरली आहे.

ठळक मुद्देसातार्‍याचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसलेकोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले तामिळनाडूतील तंजावर येथील छत्रपती बाबाजीराजे भोसलेजिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने एकाच विचारपिठावर येण्याचा हा योग

सिंदखेडराजा : महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन वशंज  एकाच वेळी मातृतिर्थावरील ४२0 व्या राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवास  आवर्जून हजर होते. कौटुंबिक कार्यक्रमासाठी गाठी भेटी होत असल्या तरी सामाजिक  विचारांचे मंथन    होत असलेल्या या कार्यक्रमात प्रथमच त्यांचे एकत्र  येणे  ही  महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.सातार्‍याचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती खासदार  संभाजीराजे भोसले आणि तामिळनाडूतील तंजावर येथील छत्रपती बाबाजीराजे भोसले हे  जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने एकाच विचारपिठावर येण्याचा हा योग होता. खुद्द छत्रपती  संभाजीराजे भोसले यांनी ही बाब  बोलून दाखवली. एका ठिकाणी एकाच विचारपिठावर  पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचे तिनही वंशज एकत्र आले. सार्वजनिक  कार्यासाठी ते एकत्र आले ही महत्त्वाची घटना आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, दिल्ली ते  जिंजी असा दबदबा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी २0१८  रोजी थेट दिल्लीमध्ये साजरी करण्याची घोषणाच छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी  यावेळी केली. त्यासाठी राज्यातील खासदारांनी तयार रहावे, त्यात लक्ष घालावे, असे  आवाहनही त्यांनी केले. सोबतच सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मोर्चांची  दखल केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाने घेतली असल्याचे त्यांनी आवर्जून  सांगितले. छत्रपती बाबाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाचा इतिहास तंजावरमध्ये जिंवं त ठेवण्यात आला असून आपल्या सर्वांचा  हा इतिहास आहे, असे प्रतिपादन केले.  तंजावरमध्ये आपली संस्कृती जोपासल्या गेली असल्याचे ते म्हणाले. उदयनराजे भोसले  म्हणाले की, श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे विचारच  देशाला तारू शकतात.

अद्ययावत ग्रंथालयासाठी ५0 लाखजिजाऊ सृष्टीवर अद्ययावत ग्रंथालय तयार केले जावे. त्यासाठी आपण ५0 लाख रुपये  देऊ. या ग्रंथालयाचे काम  सुरू व्हावे, अशी अपेक्षा छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले  यांनी व्यक्त केली. दरम्यान, किल्ले संवर्धनाच्या दृष्टीने प्राप्त निधीतंर्गत जिजाऊ  सृष्टीचाही समावेश करण्याचा आपण प्रयत्न करू, असे मतही छत्रपती संभाजीराजे  भोसले यांनी यावेळी बोलतना व्यक्त केले.

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSindkhed Rajaसिंदखेड राजा