सिंदखेड राजा बुलडाणा थेट बस सुरू करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:04 IST2021-02-18T05:04:32+5:302021-02-18T05:04:32+5:30

सिंदखेड राजा:तालुका ठिकाण असलेल्या सिंदखेड राजा ते जिल्हा कचेरी बुलडाणा अशी थेट बस सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी ...

Sindkhed Raja Buldana start live bus! | सिंदखेड राजा बुलडाणा थेट बस सुरू करा!

सिंदखेड राजा बुलडाणा थेट बस सुरू करा!

सिंदखेड राजा:तालुका ठिकाण असलेल्या सिंदखेड राजा ते जिल्हा कचेरी बुलडाणा अशी थेट बस सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे एसटी विभाग नियंत्रक यांच्याकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेहेत्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव, शेख यासीन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजेंद्र आंभोरे यांनी यासंदर्भातील निवेदन सिंदखेड राजा एसटी नियंत्रक यांच्या माध्यमातून विभाग नियंत्रक यांना दिले आहे. या निवेदनात सिंदखेड राजा बुलडाणा बस नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत असल्याचे नमूद केले आहे. ही बस सेवा १५ दिवसात सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याच निवेदनात सिंदखेड राजा बस स्थानकात डांबरीकरण नसल्याने खड्डे व धुळीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून या परिसरात तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Sindkhed Raja Buldana start live bus!