राजमाता जिजाऊंना प्रथमच साधेपणाने अभिवादन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST2021-01-13T05:30:44+5:302021-01-13T05:30:44+5:30
जिजाऊ राजवाड्यात सकाळी ६ वाजता पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ...

राजमाता जिजाऊंना प्रथमच साधेपणाने अभिवादन!
जिजाऊ राजवाड्यात सकाळी ६ वाजता पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी सपत्नीक राजमाता जिजाऊंचे पूजन केले. मराठा सेवासंघाच्या वतीने सेवासंघाचे पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांचे पूजन करण्यात आले. यात जयश्रीताई कामाजी पवार, प्रीतीताई सौरभ खेडेकर, वंदनाताई मनोज आखरे, अर्चनाताई सुभाष कोल्हे, वनिताताई मोहन अरबट, किरणताई राजेंद्र ठोसरे, ज्योतीताई शिवाजी जाधव, अरुणाताई योगेश पाटील, शीतलताई शिवाजी तनपुरे, मोहिनीताई रवींद्र चेके यांचा समावेश होता. त्यानंतर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष सतीश तायडे, मुख्याधिकारी प्रशांत भटकर, उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, पोलीस निरीक्षक जयवंत सातव, जिल्ह्यातून आलेले पोलीस अधिकारी यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिजाऊ राजवाडा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजेसाठी उघडण्यात आला. सिंदखेड राजा शहरात १४४ कलम लागू असल्याने शहराकडे येणारे सर्व मुख्य मार्ग पोलिसांनी बंद केले होते. कोरोना विषाणू संकटामुळे यंदा जिजाऊसृष्टीवर सर्वच कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या वतीने सिंदखेड राजा शहराकडे येणाऱ्या मार्गावर सोमवारी सायंकाळपासूनच नाकाबंदी करण्यात आली. परिणामी, दरवर्षी जिजाऊसृष्टीवर लोटणाऱ्या जनसागराला पायबंद बसला.