मतदान यंत्रावर प्रथमच झळकणार सर्व पक्षांची चिन्हे

By Admin | Updated: September 28, 2014 23:20 IST2014-09-28T23:20:28+5:302014-09-28T23:20:28+5:30

तब्बल २५ वर्षांनंतर मतदान यंत्रावर सगळ्या राजकीय पक्षाची चिन्हे दिसतील.

Signs of all parties to be seen for the first time in a polling machine | मतदान यंत्रावर प्रथमच झळकणार सर्व पक्षांची चिन्हे

मतदान यंत्रावर प्रथमच झळकणार सर्व पक्षांची चिन्हे

जयदेव वानखडे / जळगाव जामोद (बुलडाणा)
सर्व राजकीय पक्षाच्या युत्या-आघाड्या संपुष्टात आल्यामुळे २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान यंत्रावर सगळ्या राजकीय पक्षाची चिन्हे दिसतील हा योग महाराष्ट्रामध्ये तब्बल २५ वर्षानंतर आला आहे.
जळगाव जामोद मतदारसंघ जिल्हय़ातून सर्वात मोठा असल्याने येथे प्रचारात उमेदवार व कार्यक र्त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. जळगाव, संग्रामपूर, शेगाव हे तीन तालुके फिरताना विजयाचे गणित मांडावे लागणार आहेत. भाजपातर्फे विद्यमान आ.डॉ. संजय कुटे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दुसर्‍यांदा रामविजय बुरुंगले, शिवसेनेतर्फे संतोष घाटोळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रकाश ढोकणे, भारिप बमसं महासंघाकडून दुसर्‍यांदा प्रसेनजीत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गजानन वाघ यानंतर बहुजन समाजपार्टी, समाजवादी पार्टी या राजकीय पक्षांचे उमेदवारा व्यतिरिक्त अपक्षांची गर्दी यावेळी मतदारसंघात दिसणार आहे.
यावेळी सगळे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने प्रत्येक राजकीय नेत्यांना आपापल्या परिसरात आपापल्या पक्षाचे अस्तित्व मतदानामधून दाखवावे लागेल. नाहीतर पक्षपातळीवर त्यांची किंमत झिरो होऊ शकते. तेव्हा २0१४ च्या या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने उदयापासून सुरुवात होत आहे आणि त्यामध्ये जनतेला आता उमेदवारांचा कळवळा दिसणार आहे.

Web Title: Signs of all parties to be seen for the first time in a polling machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.