बुलडाणा जिल्ह्यात गावोगावी स्थापन करणार शुकदास प्रार्थना मंडळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 13:47 IST2018-03-16T13:47:42+5:302018-03-16T13:47:42+5:30

हिवरा आश्रम : विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष शुकदास महाराज समाधी सोहळ्यानिमित्त विवेकानंद आश्रमाच्यावतीने संपर्कयात्रा काढण्यात येणार असून, २०० गावांतून ही यात्रा फिरणार आहे

Shukdas Prarthana Mandal to set up villages in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यात गावोगावी स्थापन करणार शुकदास प्रार्थना मंडळ 

बुलडाणा जिल्ह्यात गावोगावी स्थापन करणार शुकदास प्रार्थना मंडळ 

ठळक मुद्देविवेकानंद आश्रमाच्यावतीने संपर्कयात्रा काढण्यात येणार असून, २०० गावांतून ही यात्रा फिरणार आहे. गावोगावी स्वामी शुकदास महाराज प्रार्थना मंडळे स्थापन करावीत, असा निर्णय विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळ बैठकीत झाला होता. अन्नदानाचा खर्च उचलण्यासाठी काही भाविकांचे, अन्नदात्यांचे गटही पुढे आले आहेत.

हिवरा आश्रम : विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष शुकदास महाराज समाधी सोहळ्यानिमित्त विवेकानंद आश्रमाच्यावतीने संपर्कयात्रा काढण्यात येणार असून, २०० गावांतून ही यात्रा फिरणार आहे. वेदांताचार्य गजानन शास्त्री हे संपर्कयात्रेचे नेतृत्व करणार असून, गावोगावी शुकदास महाराज प्रार्थना मंडळे स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. शुकदास महाराज यांच्या महानिर्वाणास २५ मार्च रोजी येणाºया रामनवमीला वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्त तीन दिवशीय समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सहभाग वाढावा, गावोगावी स्वामी शुकदास महाराज प्रार्थना मंडळे स्थापन करावीत, असा निर्णय विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळ बैठकीत झाला होता. त्या अनुषंगाने वेदांताचार्य गजानन शास्त्री यांच्या नेतृत्वात आठवडाभराची संपर्कयात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा गावोगावी जावून शुकदास महाराजांचे जीवित व आध्यात्मिक कार्य, विवेकानंद आश्रमाच्या सेवाकाºयाची माहिती, या सेवाकाºयात लोकसहभाग वाढविणे याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. या संपर्कयात्रेत आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरुषोत्तम अकोटकर, पंढरीनाथ शेळके, गंगाधर निकस, हभप निवृत्तीनाथ येवलेशास्त्री, विष्णू थुट्टेशास्त्री, शिवदास सांबापुरे, वसंतअप्पा सांबापुरे, संजय भारती, एकनाथ आव्हाळे, राजेंद्र आव्हाळे, बबनराव लहाने, मोतीराम थोरहाते यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती सचिव संतोष गोरे यांनी दिली.

लोकसहभागातून महाप्रसाद !

शुकदास महाराज समाधी सोहळ्यानिमित्त तीन दिवस राज्यभरातून येणाºया भाविक-भक्तांना अन्नदान केले जाणार आहे. तसेच, महाप्रसादाचेही वाटप होणार आहे. या अन्नदानात लोकसहभाग असावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. अन्नदानाचा खर्च उचलण्यासाठी काही भाविकांचे, अन्नदात्यांचे गटही पुढे आले आहेत, अशी माहितीही गोरे यांनी दिली.

Web Title: Shukdas Prarthana Mandal to set up villages in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.