श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST2021-01-10T04:26:37+5:302021-01-10T04:26:37+5:30

मेहकर : अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध भागांत निधी संकलन करण्यात येत आहे. ...

Shriram Temple Construction Fundraising Campaign | श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान

श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान

मेहकर : अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध भागांत निधी संकलन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे तालुका कार्यालय उद्घाटन प.पू. १००८ महंत स्वामी अखंड चैतन्य पुरी महाराज श्री क्षेत्र नीलकंठेश्वर संस्थान मंठा जि. जालना यांचे हस्ते १२ जानेवारी रोजी हाेणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर निर्माण कार्याला प्रारंभ झाला असून, सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य श्रीराम मंदिर साकारणार आहे. यानिमित देशव्यापी ग्रामवस्ती गृहसंपर्क व निधी संकलन अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी यादरम्यान सुरू होणार आहे. यासाठी मेहकर नगर व तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार, अशी अधिकृत माहिती श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: Shriram Temple Construction Fundraising Campaign