श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST2021-04-16T04:34:39+5:302021-04-16T04:34:39+5:30

किनगाव जट्टू : येथे कोरोना महामारीचे नियम पाळून श्री स्वामी समर्था आध्यात्मिक व बालविकास केंद्राच्या वतीने नागरिकांना मोफत ...

Shri Swami Samarth Prakat Din Celebrated | श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा

किनगाव जट्टू : येथे कोरोना महामारीचे नियम पाळून श्री स्वामी समर्था आध्यात्मिक व बालविकास केंद्राच्या वतीने नागरिकांना मोफत मास्क वाटप करून श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला़

येथील स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे आयोजन करण्यात आले हाेते. यानिमित्त अभिषेक, पूजाअर्चा, आदी धार्मिक कार्यक्रमानंतर कोरोना संसर्ग आजार टाळण्याकरिता प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक असल्यामुळे स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कमल किशोर तातेड यांच्या हस्ते एक हजार मास्क वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी येथील सरपंच शारदाबाई महाजन, लोणार पंचायत समिती सदस्य अरुणा महाजन तसेच निर्मला भालेराव, सेवानिवृत्त शिक्षक शामराव सातपुते, संदीप मोहरील, गणेश काकड, विनोद सातपुते, प्रसाद कापकर, आदी महिला व पुरुष सेवेकरी उपस्थित होते.

Web Title: Shri Swami Samarth Prakat Din Celebrated