श्रींची पालखी उद्या खामगावात
By Admin | Updated: July 31, 2014 01:30 IST2014-07-31T00:56:17+5:302014-07-31T01:30:04+5:30
सकाळी होणार नगरपरिक्रमा : रात्रीचा मुक्काम खामगावात.

श्रींची पालखी उद्या खामगावात
खामगाव : प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत गजानन अवलिया महाराज संस्थान शेगावची पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून अश्व, गजराज व वारकरी बंधुंसह हरिनामाच्या जयघोषात व ेटाळमृदंगाच्या गजरात शुक्रवार १ ऑगस्ट रोजी शहरात येत आहे. सकाळी ११ वाजता हनुमान व्हिटॅमिन मध्ये पालखीचे आगमन होवून तेथे सकाळचे भोजननंतर शहरात नगर परिक्रमेसाठी निघणार आहे. त्यानंतर बाळापूर फैल ते गौतम चौक, भुसावल चौक, सरकी लाईन ते मेन रोडने महावीर चौकातून मित्र समाज छापखान्या समोरुन कमान गेट, महात्मा गांधी पुतळा, पंचायत समिती, तहसील कोर्ट समोरुन, सप्तश्रृंगी माता मंदिर, देशमुख प्लॉट, शाळा क्र.६ चे मागील बाजूने डॉ.एकबोटे चौकातून अग्रसेन चौक, महावीर चौक ते फरशी, सराफा पोष्ट ऑफीस समोरुन सावरकर चौक, पुरवार गल्ली मार्गे शिवाजी वेसमधून डॉ.पी. जी. पोतदार यांच्या दवाखान्यासमोरुन पंढरी पाटील मार्गे श्री संत गजानन महाराज मंदिर सुटाळपुरा येथे पोहोचणार आहे. त्यानंतर श्रींचे मंदिरात सायंकालीन आरती होईल. यानंतर सिध्दीविनायक गणपती मंदिरासमोरुन फरशी मार्गे स्टेट बँक समोरुन श्री देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे आल्यानंतर याठिकाणी पालखीचा मुक्काम राहणार आहे. शनिवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता पालखी अग्रसेन चौकातून मित्र समाज छापखान्यासमोरुन स्व.श्री गोविददासजी भाटीया मार्गाने बारादरी, लोकमान्य टिळक पुतळा, चांदमारी मार्गाने शेगावकडे प्रस्थान करणार आहे. यादरम्यान हजारो भाविक पालखीसोबत जाणार आहेत. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन अवलिया महाराज भक्त मंडळ सुटाळपुरा यांनी केले आहे.