श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

By Admin | Updated: August 31, 2014 23:53 IST2014-08-31T23:24:16+5:302014-08-31T23:53:15+5:30

संत गजानन महाराजांच्या १0४ वा पुण्यतिथी महोत्सव संत नगरीत शनिवारी उत्साहात.

Shree's death anniversary concludes | श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या १0४ वा पुण्यतिथी महोत्सव संत नगरीत शनिवारी उत्साहात पार पडला. या महोत्सवाची आज रविवारी यशस्वी सांगता करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडले. समाधी महोत्सवानिमित्त संत नगरीत शुक्रवारी ६१२ भजनी दिंडी सहभागी झाल्या होत्या. सोबतच एक लाखाच्यावर भाविकांची या महोत्सवात उपस्थिती होती. शनिवारी लक्षावधी भाविकांनी समाधी दर्शनाचा लाभ घेतला. सोबतच हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. आज रविवारी सकाळी ६ ते ७ या वेळेत काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर दहीहंडी गोपाळकाला झाला. गोपाळ काल्याने समाधी महोत्सवाची सांगता झाली.

Web Title: Shree's death anniversary concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.