दारुविकणारा व पिणारा दाखवा, बक्षिस मिळवा

By Admin | Updated: December 8, 2015 02:28 IST2015-12-08T02:28:41+5:302015-12-08T02:28:41+5:30

ग्रामसभेत अभिनव ठराव; दारुविक्रेत्यांवर होणार दंडात्मक कारवाई.

Show a drinker and drinker, get a reward | दारुविकणारा व पिणारा दाखवा, बक्षिस मिळवा

दारुविकणारा व पिणारा दाखवा, बक्षिस मिळवा

भरोसा (जि. बुलडाणा): दारु विकणारा व पिणार दाखवा अन पाचशे रुपये बक्षिस मिळवा असा ठराव चिखली तालुक्यातील भरोसा येथे दारुबंदीसाठी ग्रामस्थ, महिला व ग्रा.पं.सदस्य यांच्या उपस्थितीत शनिवारी घेण्यात आला. शिवाय गावातील दारु विकणारा व त्यास मदत करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईच्या सुचनाही या ग्रामसभेत देण्यात आल्या. चिखली तालुक्यातील भरोसा येथे अवैधदारु विक्री जोमात सुरु आहे. यामुळे गावातील अनेक युवक व्यसनाधिन झाले, कौटुंबिक कलह व सार्वजनिक भांडणाने उच्छाद मांडला होता. मायबाप सरकार यापासून आपली सुटका करेल अशी अपेक्षा होती. पण पोलिस विभागाच्या सततच्या दुर्लक्षामुळे येथील ग्रामस्थांनी आ पल्या गावातील समस्य आपणच सोडविण्याचा निर्णय घेतला. सरपंच सौ रंजना नरहरी थुट्टे यांच्या मार्गदर्शनात दारुला गावातून हद्दपार करण्यासाठी गावातील सर्वानी एकत्रित येवून ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव पारीत केला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामसेवक सह.सोयायटी, शाळा व्यवस्थापन समिती, पोलिस मित्र मंडळ, तंटामुक्त ग्राम समिती, अँटो युनियन व ग्रामस्थ यांनी गावात दारुबंदी ठेवण्यासंर्दभात सामुहिक शपथ घेतली.

Web Title: Show a drinker and drinker, get a reward