भूमिअभिलेख कार्यालयातील चौघांना कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: July 10, 2015 00:09 IST2015-07-10T00:09:48+5:302015-07-10T00:09:48+5:30
शेगावातील भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचा-यांनी नशेत घातला होता गोंधळ.

भूमिअभिलेख कार्यालयातील चौघांना कारणे दाखवा नोटीस
शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचार्यांनी एमएसईबी चौकात दारूच्या नशेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणाची चौकशी जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांनी स्वत:कडे घेतली आहे. या प्रकरणातील चौघांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शेगावच्या एमएसईबी चौकात मंगळवारी सायंकाळी तालुका भूमिअभिलेख विभागाच्या काही कर्मचार्यांनी आपसात हाणामारी केली व भूमिअभिलेख कार्यालयातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज चौकातील रस्त्यावर आणून फेकले. बुधवारी याबाबत वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच त्याची गंभीर दखल घेत भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक जांभोरे यांनी या कर्मचार्यांना नोटीस बजावून १३ जुलै रोजी बुलडाणा येथील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश बजावल्याची माहिती आहे. सहायक उपअधीक्षक मनीष कुळकर्णी यांनी याबाबतच्या सूचना या प्रकरणातील अमोल राऊत, अमोल शेरेकर, आर.व्ही. राठोड,आणि व्ही.बी. देशमुख यांना दिल्या आहेत.