आणेवारीची वास्तविक स्थिती दर्शवा
By Admin | Updated: November 8, 2014 23:44 IST2014-11-08T23:44:33+5:302014-11-08T23:44:33+5:30
आमदार सपकाळ यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी.

आणेवारीची वास्तविक स्थिती दर्शवा
बुलडाणा : उशिरा झालेला पाऊस व शेतकर्यांच्या उत्पादनात झालेली घट या पृष्ठभूमिवर आणेवारी ही ५0 पैशापेक्षा कमी येणे अभिप्रेत आहे, तरी महसूल विभागाने वास्तविक स्थितीबाबत नोंद करून कार्यवाही करावी, अशी मागणी आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी विभागीय आयुक्त ज्ञानेश राजुसकर यांच्यासोबत चर्चा करताना केली. बुलडाणा व मोताळा तालुक्यातील हवालदिल झालेल्या शेतकर्यांसाठी ८ नोव्हेंबर रोजी आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावती विभागाचे आयुक्त राजुसकर यांच्यासोबत प्रत्यक्ष शिवारफेरी काढली. यावेळी त्यांनी वाघजाय टाकळी शिवारातील सोपान धोंडू शिंबरे यांच्या शेतात पाहणी करताना आ.सपकाळ यांनी विभागीय आयुक्त राजुसकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी महसूल यंत्रणेकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, मुख्त्यारसिंग राजपूत, सभापती गणेश बस्सी, पं.स.सभापती संजय किनगे, जि.प.सदस्य अनिल खाकरे, रमेश एण्डोले आदी उपस्थित होते.