शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ९० हजार शेतकऱ्यांनाही पीक कर्ज द्यावे -  सहकार आयुक्तांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:57 IST

गतवर्षी वंचित राहलेल्या जिल्ह्यातील ९० हजार शेतकºयांना बँकांनी प्राधान्यक्रमाने पीक कर्ज वाटप करण्याच्या सुचना सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी बुलडाणा येथे दिल्या.

- नीलेश जोशीबुलडाणा: कर्जमाफी मिळालेल्या परंतू पीक कर्जापासून गतवर्षी वंचित राहलेल्या जिल्ह्यातील ९० हजार शेतकºयांना बँकांनी प्राधान्यक्रमाने पीक कर्ज वाटप करण्याच्या सुचना सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी बुलडाणा येथे दिल्या. गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्का अवघा ३४.१५ टक्के होता. त्यामुळे यंदा राष्ट्रीयकृत, व्यापारी आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकांनी प्राधान्याने या शेतकºयांपर्यंत पोहेचून त्यांना पीक कर्ज द्यावे असे सहकार आयुक्तांनी अधोरेखीत केले आहे. मुळात कर्जमाफी मिळालेल्या १०० टक्के शेतकºयांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करण्याचे त्यांनी सांगितले.बुलडाणा येथील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत चार जून रोजी सहकार आयुक्तांनी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची स्थिती जाणून घेतली. त्यावेळी गत वर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तथा व्यापारी बँकांनी तब्बल ९० हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली असतानाही त्यांना पीक कर्ज दिले नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यावेळी ही बाब गांभिर्याने घेत सहकार आयुक्त सतिश सोनी बँकाना उपरोक्त निर्देश दिले आहेत. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थाक उत्तम मन्वर, जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्यासह अन्य उपस्थित होते.कर्जमाफी मिळाली त्यांना पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या वर्षी त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहले होते. बँकांच्या प्रतिनिधींनी शेतकरी वर्गच बँकांकडे अ‍ॅप्रोच झाला नसल्याचे सांगताच सहकार आयुक्तांनी बँकानी स्वत: अशा शेतकºयांकडे अ‍ॅप्रोच होऊन त्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करावे, असे स्पष्ट केले. पीक कर्जाचा मुुद्दा बँकांनी अत्यंत गांभिर्याने घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या असल्याचे या बैठकीस उपस्थित असलेल्या सुत्रांनी स्पष्ट केले. प्रामुख्याने ग्रामीण बँका व व्यावसायिक बँकांनी कर्जमाफी मिळालेले शेतकरी १०० टक्के कव्हर केले नसल्याचेही सहकार आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केले. परिणामस्वरुप गेल्या  खरीप हंगामात एक हजार ७४५ कोटींचे उदिष्ट असताना अवघे  ५९६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले. त्याचा टक्काही अवघा ३४.१५ टक्के होता. २०१५-१६ आणि २०१६-१७ अनुक्रमे ७५ टक्के व ७८ टक्के पीक कर्ज वाटप झाले होते. ते पाहता यंदा  गतवर्षीसारखा प्रकार होणार नाही, याची काळजी घेण्याबाबतही त्यांनी सुचीत केले.

कर्जमाफी मिळालेल्या १०० टक्के शेतकºयांना बँकांनी पीक कर्ज वाटप करावे, असे निर्देश सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी दिले आहेत. जिल्हा बँकेतील कर्जमाफी मिळालेल्या २२ हजार शेतकºयांना राष्ट्रीय बँका तथा व्यापारी बँकांकडू पीक कर्ज देण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने आम्ही तसे सर्टीफाईड करून दिलेले असल्याने या शेतकºयांना पीक कर्ज मिळण्यात अडचण जाणार नाही. ८१७ गावातील या शेतकºयांची नावे सर्टीफाईड करून राष्ट्रीयकृत बँकांकडे दिल्या गेली आहेत.- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा