शॉर्टसर्किटने लागली आग

By Admin | Updated: February 20, 2016 02:16 IST2016-02-20T02:16:15+5:302016-02-20T02:16:15+5:30

देऊळगाव राजा तालुक्यातील घटना; ७0 हजारांचे नुकसान.

Shortcricket took fire | शॉर्टसर्किटने लागली आग

शॉर्टसर्किटने लागली आग

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा): अंभोरा शिवारातील शेतकर्‍याच्या शेतातील कडब्याच्या गंजाला शॉर्टसर्किटमुळे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास आग लागली. यात सदर शेतकर्‍याचे जवळपास ७0 हजारांचे नुकसान झाले. एकीकडे निसर्गाची मार तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने शेतकरी जेरीस आला आहे. यात देऊळगाव राजा येथील शेतकरी भगवान बाबूराव तिडके यांच्या अंभोरा शिवारातील शेतात जनावरांसाठी चारा (कडबा) जमा करून ठेवण्यात आला होता. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने शेतात कडब्याच्या गंजीला अचानक आग लागली. त्यात शाळू कडबा तीन हजार पेंढी आणि मक्का पाचशे पेंढी जळून खाक झाल्याने अंदाजे ७0 हजारांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, नगरसेवक राजेंद्र खांडेभराड, विठ्ठलराव वाघ, गिरीष वाघमारे, विजय खांडेभराड, रंगुनाथ गोरे, सुरेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल खांडेभराड, डिगांबर तिडके यांनी प्रयत्न केले. त्यामुळे मोठी हानी टळली. यावेळी महावितरण कंपनीकडून अजबल, लाईनमन शरीफ खान यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Web Title: Shortcricket took fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.