कोविड केअर सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:56 IST2020-09-26T16:54:55+5:302020-09-26T16:56:52+5:30
- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहर आणि तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप असतानाच खामगाव येथील कोविड केअर ...

कोविड केअर सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा!
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहर आणि तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप असतानाच खामगाव येथील कोविड केअर सेंटरवर औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
खामगावात कोरोना संदिग्ध रूग्णांची हजाराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. गत आठवड्यातच खामगावातील कोरोना रूग्णांच्या संख्येने नऊशेचा उंबरठा पार केला. तर तालुक्यातही कोरोना संदिग्ध रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यात लवकरच कोरोना रूग्णसंख्या दीड हजारावर पोहोचणार असल्याचे संकेत आहेत. खामगाव येथील कोविड रूग्णालय कधीचेच हाऊसफुल्ल झाले आहे. ५० बेडची क्षमता असलेल्या या रूग्णालयात सद्यस्थितीत एकही बेड शिल्लक नाही. अशातच कोविड केअर सेंटरमध्येही मोठ्याप्रमाणात संदिग्ध रूग्णांना क्वारंटीन करण्यात आले आहे.
सर्दी आणि खोकल्याच्या औषधांचा तुटवडा होता. त्यामुळे काही रूग्णांना विलंबाने औषध देण्यात आली. आता कोविड केअर सेंटरवर औषधे उपलब्ध झाली आहेत. सर्वांनाच नियमित औषध दिल्या जाताहेत. चार दिवसांपासून औषधे मिळाली नसल्याची वस्तुस्थिती खरी नाही.
- डॉ. संजय चव्हाण
कोविड केअर सेंटर, खामगाव.