पाडळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:09+5:302021-04-25T04:34:09+5:30

सध्या कोराेनाचा वाढता उद्रेक बघता नागरिक देखील लस घेण्यासाठी प्राथमिक आराेग्य केंद्रात गर्दी करीत असल्याचे चित्र आहे . ...

Shortage of Kovid vaccine at Padli Primary Health Center | पाडळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीचा तुटवडा

पाडळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीचा तुटवडा

सध्या कोराेनाचा वाढता उद्रेक बघता नागरिक देखील लस घेण्यासाठी प्राथमिक आराेग्य केंद्रात गर्दी करीत असल्याचे चित्र आहे . पाडळी प्राथमिक आराेग्य केंद्र अंतर्गत इस्लापूर ,मड ,गुम्मी, तराडखेड, मासरूळ ,जनुना ,डोमरूळ ,धामणगाव टाकळी असे अनेक गावात येतात़ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोराेनाचे संक्रमण वाढत आहे़ त्यामुळे खबरदारी बाळगत आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे़ ४५ वर्षांच्या नागरिकांना काेराेनाची लस घेण्याचे आवाहन देखील आरोग्य कर्मचारी आशा सेविका करीत आहे़ पाडळी येथील आरोग्य विभाग मागील दीड महिन्यात अनेकांनी लस घेतली आहे़ अनेकांनी दुसरा डाेसही घेतला आहे़ परंतु मागील चार ते पाच दिवसापासून येथील आरोग्य केंद्रात लसीचा तुटवडा निर्माण झाला असल्याने दवाखान्यात लस टाेचण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत आहे़ वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन लस उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे़

लस लवकरच उपलब्ध हाेईल

मागील चार ते पाच दिवसापासून लस उपलब्ध नाही़ त्यामुळे लसीकरण करता आले नाही़ लस उपलब्ध होताच पुन्हा सुरळीत लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल असे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुपकर यांनी सांगितले़

मासरुळ गावातील नागरिकांनी लस घेण्याची कोणतीही भीती न बाळगता लवकरात लवकर कोरोनाशी सामना करण्यासाठी लस घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाडळी आराेग्य केंद्रात लस उपलब्ध करून द्यावी.

शकुंतला गणपत महाले, सरपंच, मासरूळ

Web Title: Shortage of Kovid vaccine at Padli Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.