दुकाने बंद; तरीही दारूची अवैध विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:12 IST2017-04-26T00:12:21+5:302017-04-26T00:12:21+5:30

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : जानेफळ परिसरात नियमाची पायमल्ली!

Shops Off; Still illegal sale of alcohol! | दुकाने बंद; तरीही दारूची अवैध विक्री!

दुकाने बंद; तरीही दारूची अवैध विक्री!

जानेफळ: न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य महामार्गापासून ५०० मीटरवर असलेले बिअर बार, दारूची दुकाने वाइन शॉप बंद करण्यात आल्याने सर्व दारूबंदीचे वातावरण तयार झाले; मात्र तरीही जानेफळ परिसरात वेगवेगळी शक्कल लढवून मोठ्या प्रमाणावर दारू विक्री सुरू आहे. याला पोलीस व उत्पादन शुक्ल विभागाचे अशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे.
जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जानेफळ व खेडे परिसरात असे चित्र आता दिसून येत आहे. लग्नसराई असल्यामुळे दारूबंदीच्या काळातही दारूचा महापूर वाहात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाद- विवादाच्या घटना घडत आहे. गावात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत असताना ही दारू येते कोठून, याचा शोध घेण्याऐवजी पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे जानेफळ गावात दारू पिऊन रस्त्यावर लोळणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ही दारू येते कोठून असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या गल्ली बोळात खुलेआम देशी तसेच विदेशी आणि हातभट्टीची दारू विक्र ी केल्या जात आहे. विशेष म्हणजे ही दारू दामदुप्पट दराने विकल्या जात आहे. हातभट्टीच्या दारूचे भाव तर तिपटीने वाढल्याचे सांगण्यात येते. लग्नसराई असल्यामुळे लग्नसाठी दारूचा पुरवठा करणारे स्वतंत्र लोक असून, पिणाऱ्यांची ते व्यवस्था करून देतात. या दारूमुळे लग्नात विघ्न आणल्या जात असून, पोलीस यंत्रणेचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.

अवैध व्यवसाय वाढले
जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्रीपाठोपाठ अवैध व्यवसाय वाढले आहेत. या पोली स्टेशन अंतर्गत एकूण ४८ गावे असून, या पोलीस स्टेशनला ठाणेदार मोरे रुजू झाल्यापासून अवैध व्यवसायांना खुलेआम मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळे वरली, जुगार, तासपत्ता अशा प्रकारच्या व्यवसायांना ऊत आला आहे. या मोबदल्यात पोलिसांना लाखो रुपयांची माया मिळत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करतात.

Web Title: Shops Off; Still illegal sale of alcohol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.