दुकानाला आग ; एक लाखाचे नुकसान
By Admin | Updated: November 16, 2014 00:11 IST2014-11-16T00:11:04+5:302014-11-16T00:11:04+5:30
दुसरबीड येथील घटना.

दुकानाला आग ; एक लाखाचे नुकसान
दुसरबीड (बुलडाणा): स्थानिक बस थांब्यावरील बुट हाऊसच्या एका दुकानाला आग लागून १ लाख १0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री दरम्यान घडली. किशोर बाबूलाल शिपे यांचे बुट हाऊसचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे सायंकाळी आपले दुकान बंद करुन घरी गेले होते. रात्री दरम्यान त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली; परंतु आग आटोक्यात येईपर्यंत दुकानातील बुट, चप्पल आदी साहित्य जळून खाक झाले होते. यामध्ये किशोर शिपे यांचे १ लाख १0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.