दुकान फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: October 26, 2014 23:38 IST2014-10-26T23:38:38+5:302014-10-26T23:38:38+5:30
डोणगाव येथे चोरट्यांनी मोटार दुरूस्तीचे दुकान फोडले.

दुकान फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास
डोणगाव (बुलडाणा): डोणगाव पोलिस ठाण्यापासून २00 मीटर अंतरावर असणार्या मोटर रीपेअरिंगचे दुकान फोडून ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.
डोणगाव येथे महम्मद शहादतउल्ला म. शफीउल्ला फारूकी यांचे मोटर रीपेअरिंगचे दुकान आहे. त्यांनी आज रविवारी सकाळच्या सुमारास दुकान उघडले असता, दुकानाच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून साहित्य लंपास केल्याचे आढळून आले. त्यामध्ये सिंगल फेज २ एच.पी. व ३ एच.पी. मोटर, तांब्याच्या तारा, भंगार साहित्य, सबर्मसिबल बुशिंग २0 किलो, वायर यांसह एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याच दुकानात मागील महिन्यात चोरी झाली होती. याबाबत पोलिस ठाण्याला फिर्याद देऊनही पोलिसांनी दखल घेतली नव्हती. त्यामुळे चोरट्यांना अभय मिळत असून, चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.